MarathiSoul

Shankarachi Aarti | शंकराची आरती | लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

shankarachi aarti

shankarachi aarti | शंकराची आरती/लवथवती विक्राळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

shankarachi aarti | शंकराची आरती

shankarachi aarti

भारतीय संस्कृतीत भगवान शंकर (महादेव, भोलेनाथ) यांचे स्थान अत्यंत उच्च मानले गेले आहे. महाशिवरात्री, श्रावण महिना, सोमवार, तसेच इतर अनेक शिवपूजांच्या प्रसंगी शंकराची आरती म्हणण्याला विशेष महत्त्व आहे. ही आरती भक्ती, शक्ती आणि शांततेचे प्रतीक आहे. shankarachi aarti lyrics

👉 सत्यनारायण आरती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शंकराची आरती हे एक पवित्र स्तोत्र आहे जे भगवान शिवाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करण्याचे एक माध्यम आहे. दररोज किंवा विशेष दिवशी ही आरती म्हणल्याने जीवनात सकारात्मकता आणि भक्ती वाढते. चला तर मग, दररोजच्या आराधनेचा भाग म्हणून शंकराची आरती म्हणायला सुरुवात करूया!

shankarachi aarti marathi

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top